कराडातील युवकाच्या खून प्रकरणी दोघांना अटक; पाच तासात पुण्यातून ताब्यात घेतले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी : सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील चौंडेश्‍वरी नगर, गोवारे येथील मळी नावाच्या शिवारात दारु पिताना झालेल्या भांडणात कराड पालिकेच्या घंटा गाडीवर काम करणार्‍या युवकाचा त्याच्याच मित्राने गुप्तीने वार करुन व दगडाने ठेचुुन खुन केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेप्रकरणी दोघांना सातारा गुन्हे अन्वेषण विभागाने पाच तासात पुणे येथून अटक केली आहे. युवकाच्या खून प्रकरणातील फरार असलेल्या आरोपींचा पोलिसांनी छडा लावला असून आकाश अनिल गवळी (वय 23) व अक्षय अनिल गवळी (वय 25) अशी नावे आहेत. तसेच ते कराड तालुक्यातील गजानन हौसिंग सोसायटी, चौंडेश्वरी नगर, गोवारे येथे राहणारे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी कि, शनिवार, दि. २६ रोजीचे कराड तालुक्यातील गोवारेतील मळी नावाच्या शिवारात सकाळी एका युवकाचा धारदार हात्याराने व दगडाने ठेचुन निर्घुण खून केलेला मृतदेह आला. कराड शहराची संवेदनशील पार्श्वभूमी लक्षात घेत पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल व अपर पोलीस अधिक्षक धीरज पाटील यांनी संबंधित खुनाचा गुन्हा उपडीस आणण्याच्या सूचना सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर घुमाळ यांना दिल्या.

त्यानंतर पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ व सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांच्याकडील तपास पथकाने गुन्हयाच्या घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळाचे जवळील व आजुबाजुचे परिसरातील साक्षीदार यांचेकडे विचापुस करुन तसेच गोपनिय चौकशीमार्फत माहिती घेतली. त्यानंतर खुन झालेला इसम किरण मुकुंद लादे असा असुन त्याचा चौहेश्वरी नगर कराड येथील दोन इसमांनी दारु पिण्याचे कारणावरून धारदार हात्याराने व दगडाने ठेचून खून केला आहे. तसेच खून करणारे दोन इसम हे पुणे येथे असलयाबाबत माहिती प्राप्त झाली. त्या अनुशंगाने पोलीस निरीक्षक धुमाळ यांनी सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे व स्थानिक गुन्हे शाखेकडील तपास पथक तात्काळ पुणे येथे रवाना केले. तपास पथकाने पुणे येथे जावून प्राप्त झालेल्या माहितीप्रमाणे दोन्ही इसमाना ताब्यात घेऊन कराड शहर पोलीस ठान्याच्या ताब्यात दिले. तसेच कराड शहर पोलीस स्टेशन गुरनं ३७९/२०२१ भादविसक ३०२ भारतीय हत्यार अधिनियम कलम ४,२५ हा खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे.

या प्रकरणात पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल व अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या सुचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस उपनिरीक्षक मधुकर गुरव, पोलिस नाईक शरद बेधले, मंगेश महाडीक, सार मुल्ला, नितिन गोगावले, प्रविण फडतरे, मुनीर मुल्ला, निलेश काटकर, प्रमोद सावंत, अधिका पोलिस कॉन्स्टेबल मयूर देशमुख, रोहित निकम, सचिन ससाणे, विशाल पचार, मोहसीन मोमीन यांनी सदरची कारवाई केलेली आहे.

Leave a Comment