दुचाकी चोरणाऱ्या दोघांना अटक, सव्वादोन लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

कुपवाड मधील नितीन गणपती ताटे यांची मोटरसायकल 29 मार्च रोजी अज्ञात चोरट्याने हॉटेल अशोका जवळून चोरीली होती. याप्रकरणी कुपवाड पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावत दोघा संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून अधिक कसून चौकशी केली असता त्यांनी पाच गुन्हे केल्याची कबुली दिली.

सदर गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटरसायकली, चोरीतील मोटरसायकल, आठ मोबाईल फोन असा एकूण 2 लाख 14 हजार यांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कुपवाड शहर व परिसरामध्ये दिवसेंदिवस भुरट्या चोरांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले होते. पोलिसांचे खास पथक तयार करून घटनस्थळीचे सी सी टी व्हि फुटेज ची पाहणी केली.

फुटेज मधील संशयितांची चेहरे हेरून खास खबऱ्यांकडून माहिती घेतली. पोलिसांनी त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच सदर मोटरसायकल चोरी केल्याची सांगितले. या प्रकरणी योगेश सुरेश शिंदे आणि सौरभ सूनील मोहिते या दोघांना अटक करण्यात आली आहे.