विशेष प्रतिनिधी । दोन पेक्षा जास्त मुलं असणाऱ्यांना २०२१ नंतर आसाम राज्यात सरकारी नोकरी मिळणार नाही. राज्य सरकारच्या २१ ओक्टोबरला झालेल्या मंत्रिमंड्ळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आसाम मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या जनसंपर्क कार्यालयानं याबाबत जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की सरकारी नोकरीत असताना २०२१ नंतर कुणाला तिसरे अपत्य झाले तर त्याचीही नोकरी जाऊ शकते. या बैठकीत जमिनीबाबत नवे धोरण मंजूर करण्यात आले. भूमिहीनांना शेतीसाठी ३ गुंठे आणि घर बांधण्यासाठी १ गुंठा जमीन देण्यात येईल. असही त्यांनी सांगितलं
२०१७ झाली आसाम सरकारनं या लोकसंख्या धोरणाच्या मसुद्याची घोषणा केली होती. या मसुद्यात दोनपेक्षा अधिक मुले असल्यास त्या व्यक्तीला सरकारी नोकरी दिली जाणार नाही, असं सूचवण्यात आलं होत. राज्यातील सर्व मुलींना विद्यापीठ स्तरापर्यंतचं शिक्षण मोफत दिलं जाणार आहे. लोकसंख्या धोरणाबाबतचा हा मसुदा आहे. आसामचे आरोग्य मंत्री हिमांता विश्व शर्मा यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली होती.