परभणी | शेतातील आखाड्यावर एका खोलीत असलेल्या हळदीच्या ढिगार्याला कीड लागू नये. म्हणून ठेवण्यात आलेल्या विषारी गोळ्यांच्या वायू नाकात गेल्याने गुदमरून 2 दोन बालकांचा मृत्यू झाला आहे. तर आई वडील ही गंभीर आहेत. ही घटना पालम तालुक्यातील आडगाव येथे घडली.
आडगाव येथील डॉक्टर बेळे यांच्या शेतात वाटेकरी असलेल्या शेतमजुरांचे कुटुंब राहत होते. या खोलीत शेताचे वाटेकरी असलेले भिमराव सदाशिव कुगणे आपल्या पत्नी व दोन मुलांना सह राहत होते. शुक्रवारी रात्री झोपल्यानंतर हा विषारी वायू खोलीमध्ये पसरला आणि श्र्वसनाद्वारे नाकात गेला.
यावेळी त्यांच्या अडीच वर्षाचा मुलगा कन्हैया व दीड वर्षाची मुलगी ज्योती या दोघांना श्वास घ्यायला त्रास सुरू झाला. तेव्हा ती झोपेतून उठले तेव्हा त्यांना श्वास घेण्यास खूप त्रास होत असल्याने गुदमरून ज्योती आणि कन्हैया हे अवस्थ झाले. भीमराव व त्यांच्या पत्नीलाही श्वास घेण्यासाठी प्रचंड त्रास होत होता. शेजाऱ्यांनी या चौघांनाही नांदेडला उपचारासाठी हलविले असता ज्योती व कन्या या दोन बालकांचा मृत्यू झाला. तर भीमराव व त्यांच्या पत्नी व नांदेड येथे एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.