कोल्हापूर | कोल्हापुरातील कळंबा कारागृहातील दोन कोरोना बाधित कैदी पळून गेल्याची घटना घडली आहे. खुनाच्या गुन्ह्यात अंडर ट्रायल दोन्ही कैदी होते. काही दिवसांपूर्वीच कैद्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे आयटीआय गोविंद सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते.
या कोरोनाबाधित कैद्यांनी उपचार सुरू असलेल्या कैद्यांनी रात्री साडेबारा वाजता खिडकीचे गज कापले आणि तेथून पसार झाले. याप्रकरणी रात्री उशिरा जुना राजवाडा पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. दोन्ही पळून जाताना अन्य कैद्यांनी आरडाओरडा केला.
सुरक्षारक्षकाने बॅटरीचा प्रकाश ज्योत टाकून पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र बंदोबस्तासाठी नियुक्त असलेल्या पोलिसांच्या डोळ्यादेखत कैदी पसार झाले. एकाच वेळी दोन कैदी पसार झाले कारागृह प्रशासनात खळबळ उडाली आहे.