कराडला दोन दिवस भव्य कबड्डी स्पर्धाचे आयोजन : सुभाषकाका पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | लिबर्टी मजदूर मंडळाने 70 किलो खालील भव्य कबड्डी स्पर्धा आयोजित केल्या आहेत. सातारा जिल्हा कबड्डी असो. व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे मान्यतेने दि. 5 व 6 मार्च 2022 रोजी कराडमध्ये लिबर्टी मजदूर मंडळाच्या क्रीडांगणावर स्पर्धा होणार आहेत, अशी माहिती लिबर्टी मजदूर मंडळाचे अध्यक्ष सुभाषकाका पाटील यांनी दिली.

विजेत्या स्पर्धक संघांना अनुक्रमे बक्षीसे देण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांक रु.51 हजार 1 व चषक (स्वर्गीय रामभाऊ रेपाळ यांचे स्मरणार्थ), व्दितीय क्रमांक रु. 31 हजार 1 व चषक (स्व. उस्मानभाई बागवान यांचे स्मरणार्थ), तृतीय क्रमांक : रु. 21 हजार 1 व चषक (स्व. ज्ञानदेव जाधव यांचे स्मरणार्थ), चतुर्थ क्रमांक :- रु. 11 हजार 1 व चषक (स्व. वसंतराव सोनवले यांचे स्मरणार्थ), वैयक्तिक बक्षीसे : उत्कृष्ट खेळाडू. रुपये 2500 व चषक (स्वर्गीय जयवंतराव जाधव यांचे स्मरणार्थ), उत्कृष्ट चढाईपटू- रुपये 2000 व चषक (स्वर्गीय धोंडीराम भोसले यांचे स्मरणार्थ), उत्कृष्ट पक्कड रुपये 2000 व चषक (स्व. मुनीर मोमीन यांचे स्मरणार्थ), उत्कृष्ट शिस्तबध्द व आदर्श संघ रुपये 3000 व चषक (स्व. भिमराव जाधव यांचे स्मरणार्थ), उत्तेजनार्थ: स्पर्धेत जे संघ उपउपांत्य फेरीत प्रवेश करतील त्यापैकी बक्षीसाचे मानकरी सोडून इतर चार संघाना प्रत्येकी 1500 रुपयांचे उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात येणार असल्याची माहिती सुभाष पाटील यांनी दिली.

राज्यातील सहभागी होणाऱ्या कबड्डी संघानी भास्कर पाटील (7218675399), दादासाहेब पाटील (9923339207), राजेंद्र जाधव (942326394), सुरेश थोरात (8698460086) संपर्क साधावा. प्रवेश फी 1000 रुपये असुन ती स्पर्धेपूर्वी गुगल पे व्दारे भरावी लागणार आहे. संघाचा प्रवेश निश्चित करुन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे खास आकर्षण आंतरराष्ट्रीय व प्रो-कबड्डी खेळाडू गिरीश इरनाक हे उपस्थित राहणार आहेत.

Leave a Comment