कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
सुपने (ता. कराड) येथे दोन दिवस मॅटवरील कुस्तीचा थरार अनुभवता येणार आहे. सातारा व सांगली जिल्हा मर्यादित मॅटवरील कुस्तीचे दि. 4 व 5 जून छत्रपती चषक भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 14, 15 व 18 वर्षाखालील मुलांच्या कुस्ती स्पर्धा वजनी गटात होणार आहेत.
या स्पर्धेवेळी नविन मॅटचे पूजन व उद्घाटन पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खा. श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी सातारा जिल्हा बॅंकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर, राष्ट्रवादी मिडिया सेलचे राज्य अध्यक्ष सारंग पाटील, महाराष्ट्र केसरी पै. आप्पासाहेब कदम, उपमहाराष्ट्र केसरी दादासाहेब थोरात, पै. नजरूद्दीन नायकवडी, जिल्हा क्रिडा अधिकारी युवराज नाईक हे उपस्थित राहणार आहेत.
स्पर्धेसाठी सकाळी 8 ते 11 या वेळेत वजन केले जाईल. खेळांडूचे आधारकार्ड व शाळांचे बोनाफाईड आवश्यक आहे. मल्लांना काॅस्टुम व मॅट शूज असेल तरच खेळविले जाईल. आंतरराष्ट्रीय नियमानुसार स्पर्धा होणार आहे. स्पर्धेला सुरूवात ही दुपारी 4 वाजता होईल.
विजेत्यांना मिळणार कायम स्वरूपी चषक
कुस्ती स्पर्धेत 14 वर्षाखालील 28, 32, 38,43 व 48 किलो वजनी गट असेल. 15 वर्षाखालील स्पर्धेत 55 व 65 तर 18 वर्षाखालील मुलाच्यांत 60 व 65 किलो वजनी गटात स्पर्धा होतील. विजेत्या स्पर्धकांना स्व. सुभेदार मेजर कै. जयसिंग दाजी पाटील यांच्या स्मरणार्थ कायम स्वरूपी चषक देण्यात येणार आहे. या स्पर्धेचे आयोजन शिवछत्रपती कुस्ती केंद्र सुपने व आजी- माजी पैलवान सुपने यांनी केले आहे.