लहान मुलांच्या खेळण्यावरुन दोन कुटुंबात तुफान हाणामारी ः एकाचा हृदयविकाराने मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली | शहरातील गवळीगल्ली परिसरात राहणाऱ्या लहान मुलांमध्ये खेळण्यावर शनिवारी सायंकाळी वाद झाला. हा वाद त्या-त्या मुलांच्या कुटुंबीयांपर्यंत जाऊन पोहोचला. यात त्या दोन मुलांचे कुटुंबीय आमने-सामने आले आणि तुफान राडा झाला. यामध्ये झालेल्या मारहाणीनंतर हृदयविकाराचा झटका आल्याने सिराज बाबासाहेब अत्तार यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

घडलेल्या या घटनेनंतर सिव्हिलसमोर दोन गट समोर आले होते. त्यावेळी त्यांच्यात वाद सुरू झाला. पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांनी तातडीने त्याठिकाणी धाव घेत वाद घालणाऱ्यांना चांगलाच चोप दिला. या प्रकरणी मृत सिराज याचा भाऊ समीर बाबासाहेब अत्तार यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आयुब सय्यद हसन सय्यद याच्यासह अनोळखी पाच ते सात जणांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. 1 मे रोजी सायकांळी पाच वाजण्याच्या सुमारास समीर यांचा लहान मुलगा रिहान हा खेळन्यासाठी बागवान हॉलच्या मागील मोकळ्या जागेत गेला होता. त्यावेळी आयुब सय्यद याचा मुलगा अरिष उर्फ मुस्तकीम आयुब सय्यद हा पण तेथे किक्रेट खेळण्यासाठी आला होता. त्यावेळी त्यांचा मुलगा व शेजारी मुलगा रिहान डिग्रजकर असे हात पाय धुन्यासाठी तेथील नळाजवळ गेले होते. त्यावेळी दोघांमध्ये त्या वादातून दोन गटात हाणामारी झाली होती.

Leave a Comment