टीम हॅलो महाराष्ट्र । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील दोन विद्यार्थिनींची वेश्या व्यवसाय करणाऱ्या दलालांच्या तावडीतून सुटका करण्यात आली आहे. दोन्ही विद्यार्थिनी परदेशी नागरिक असून तुर्कमेनिस्तानच्या रहिवासी असल्याची माहिती आहे. मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदेश रेवले यांनी सेक्स रॅकेटवर कारवाई करत दोघींची मुक्तता केली.
या कारवाईत एकूण तीन मुलींची सुटका करण्यात आली असून त्यापैकी एक भारतीय आहे. नावेद अख्तर वय २६ आणि नाविद सय्यद २२ वर्ष अशी अटक करण्यात आलेल्या दोघा दलालांची नावे आहेत. तर वेश्या व्यवसाय करणारी एक महिला फरार झाली आहे.
सुटका करण्यात दोन्ही विद्यार्थिनी स्टुडंट व्हिसावर पुणे विद्यापीठात शिक्षण घेत आहेत. वर्सोवा येथील एका फ्लॅटमध्ये मुलींना ठेवण्यात आलं होतं. पोलिसांनी बोगस गिऱ्हाईक पाठवून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. प्रत्येक मुलीच्या बदल्यात दलाल ४० हजार रुपये घेत असल्याचं तपासात समोर आलं आहे. मुंबईतील अंधेरी पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”
हे पण वाचा-
धक्कादायक! मुंबईत महिलेवर सामूहिक बलात्कार; ४ आरोपींना अटक
प्रेमवीर पोलीस कर्मचार्याचा पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न
‘नाइट लाइफ’ला भाजप नेत्याचा विरोध; म्हणे मद्यसंस्कृती वाढून महिलांवरील अत्याचारात वाढ होईल