टीम हॅलो महाराष्ट्र : वर्गशिक्षिका ८ वीतल्या विद्यार्थ्यासोबत पळून गेल्याची घटना ताजी असतानाच आता नवरदेवाचा बाप नवरीच्या आईसोबत पळून गेल्याची घटना गुजरात राज्यात घडली आहे. या घटनेनंतर सोशलमिडीयावर या घटनेची जोरदार चर्चा सुरु झाली. या प्रकरणाची संपूर्ण शहरात चर्चा सुरु झाली आहे. सुरत येथील 48 वर्षीय राकेश ( नाव बदललं आहे) यांच्या मुलाचं लग्न 46 वर्षीय आरती (नाव बदलेल आहे) यांच्या मुलीशी होणार होतं. येत्या फेब्रुवारी महिन्यात हा विवाह सोहळा पार पडणार होता. मात्र, आपल्या मुलांच्या लग्नापूर्वीच राकेश आणि आरती पळून गेले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांत हे दोघे बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे.
राकेश हे सुरतच्या कतारगाममध्ये राहतात. आरती या कतारगाममध्ये राकेश यांच्या शेजारीच राहायच्या, अशी माहिती आहे. हे दोघे अनेक काळापासून एकमेकांना ओळखायचे. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. मात्र, नंतर आरती यांचं लग्न नवसारी येथील हीरा कारागिराशी झालं. बऱ्यााच कालावधीनंतर राकेश आणि आरती हे एकमेकांना भेटले ते विहिण आणि व्याही म्हणून. राकेश यांचा मुलगा आणि आरती यांच्या मुलीचं लग्न जुळलं.
लग्न ठरल्यानंतर लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली. मात्र, या दरम्यान राकेश आणि आरतीला त्यांचं जूनं प्रेम आठवलं आणि ते कुणाचीही पर्वा न करता पळून गेले. या प्रकरणानंतर सोशल मीडियावर याची चर्चा रंगली आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News’‘