सकलेन मुलाणी । कराड
गांधील माशांनी केलेल्या जोरदार हल्ल्यात घराच्या टेरेसवर खेळणाऱ्या दोन मुलींचा मृत्यू झालेची खळबळजनक घटना सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील महिंद येथे घडली आहे गांधील माशांनी (कुंभार माशी) केलेल्या जोरदार हल्ल्यात घराच्या टेरेसवर खेळणाऱ्या दोन मुलींचा मृत्यू झाला आहे.
अनुष्का दिनेश यादव (वय १२) आणि शेजल अशोक यादव (वय८)अशी मृत मुलींची नावे आहेत.घरालगत असलेल्या पडक्या घराच्या छप्परास असलेल्या गांधील माशांच्या पोळ्याला धक्का लागल्याने माशा चवताळल्या आणि त्यांनी टेरेसवर खेळणाऱ्या मुलांवर जोरदार हल्ला चढवला. मुलांचा आरडाओरडा ऐकून मदतीसाठी टेरेसवर धावलेल्या आणखी पाच जनांनाही माशांनी चावा घेत जखमी केले आहे.
घटनास्थळी ढेबेवाडी पोलिसांनी भेट दिली यातील अनुष्का यादव ही येळगाव तालुका कराड येथील असुन महिंद येथे आजोळी आली होती. अचानक झालेल्या या अपघाताने दोन खेळकर मुलींचा मृत्यू झाल्याने महिंद येषगाव गावासह ढेबेवाडी विभागावर शोककळा पसरली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’