पसरणीत मेंढपाळाच्या दोन गटात काठ्या- कुऱ्हाडीने मारामारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

वाई तालुक्यातील पसरणी येथील धोम कालव्याच्या जवळ मेंढपाळाच्या दोन गटात मेंढ्या बसवण्याच्या कारणावरून मारामारीची घटना घडली. यामध्ये काट्या -कुऱ्हाडीचा वापर करण्यात आला असून परस्परविरोधी फिर्याद वाई पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल आहे.

याबाबत पोलिस ठाण्यातून देण्यात आलेली माहिती अशी, सतीश बबन मदने (वय-32) याने दिलेल्या फिर्यादीवरून संदीप मारुती सरक, सीमा संदीप सरक, पल्लवी चंद्रकांत सरक यांच्यासह चार ते पाच अनोळखी जणांनी तुझी बकरी तुझ्या गावाला घेऊन जा असे म्हणून कुर्‍हाडीचा दांडा आणि काठीने मारहाण केली.

तर संदीप मारुती सरक (वय – 31 रा. पसरणी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विनायक बबन मदने, सतीश बबन मदने (दोघे रा. पाडळी, ता. खंडाळा) यांनी तुम्ही येथे राहायचे नाही असे म्हणाल्याच्या कारणावरून विनायक यांनी संदीप सरक याचा हात धरला तर सतीशने कुऱ्हाडीने कपाळावर मारले. अधिक तपास पोलीस हवालदार बिराजदार व महिला पोलीस हवालदार मुजावर हे करत आहेत.

Leave a Comment