Two Helmet Rule Bike : आता 2 हेल्मेटची सक्ती!! सरकारचे महत्वपूर्ण पाऊल

Two Helmet Rule Bike
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Two Helmet Rule Bike । रस्त्यावरील वाढत्या अपघातांना आणि त्यातून होणाऱ्या मृत्यूना आला घालण्यासाठी केंद्र सरकारने दुचाकी खरेदीशी संबंधित नियमांमध्ये महत्त्वाचे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत, नवीन बाईक किंवा स्कूटर खरेदी करताना वाहन विक्रेत्याला दोन हेल्मेट देणे बंधनकारक करण्यात आले आहे. यातील एक हेल्मेट चालकासाठी आणि दुसरे हेल्मेट मागे बसणाऱ्यासाठी असेल. याविषयीची अधिसूचना येऊन धडकली आहे. त्यानुसार, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने यासाठी केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ मध्ये सुधारणांचा मसुदा जारी केला आहे.

काय आहे नवा आदेश? Two Helmet Rule Bike-

१ जानेवारी २०२६ पासून, सर्व नवीन दुचाकींमध्ये सुरक्षित ब्रेकिंग प्रणाली बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे. याअंतर्गत, सर्व दुचाकींमध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS ) बसवण्यात येईल. आतापर्यंत फक्त १५० सीसी पेक्षा जास्त क्षमता असलेल्या वाहनांसाठी एबीएस अनिवार्य होते. परंतु आता हा नियम 50 सीसी हून अधिक इंजिन क्षमता क्षमतेच्या सर्व दुचाकी वाहनांसाठी हे अनिवार्य करण्यात आला आहे. एबीएस ही एक प्रगत तंत्रज्ञान आहे जी अचानक ब्रेक लावल्यावर चाके लॉक होण्यापासून रोखते. अचानक ब्रेक लावल्यावरही यामुळे वाहनाचा तोल राखण्यास मदत होते.

या नियमांना अंतिम रूप देण्यापूर्वी परिवहन मंत्रालयाने देशभरातून त्यावर हरकती आणि सूचना मागवल्या आहेत. त्यासाठी 30 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. या काळात दुचाकीस्वार त्यांच्या हरकती आणि सूचना परिवहन मंत्रालयाला कळवू शकतील. ([email protected]) या ईमेल वर मत व्यक्त करता येईल.

हेल्मेट आणि एबीएस सारखे उपाय अनिवार्य करून (Two Helmet Rule Bike) अपघातांमध्ये होणारे मृत्यू आणि गंभीर दुखापती कमी करणे हेच केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे. देशात दुचाकीस्वारांची संख्या सर्वाधिक आहे. अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्या आणि जखमी होणाऱ्यांमध्ये बहुतेक जण दुचाकीस्वार असतात. या अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळेच केंद्र सरकारने हे महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे. सरकारला आशा आहे की या महत्त्वाच्या बदलांमुळे रस्ते अपघात कमी होतील आणि सामान्य लोकांचे जीवनही सुरक्षित होईल.