आयपीएलवर कोरोनाच संकट ; दोन भारतीय खेळाडूंना कोरोनाची लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आयपीएल चाहत्यांसाठी चिंतेची गोष्ट आहे. भारताच्या दोन खेळाडूंना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे. परंतु या खेळाडूंची नाव मात्र जाहीर करण्यात आलेली नाहीत. आयपीएलच्या टीमशी संबंधित असणाऱ्या सगळ्यांच्या एकूण १,९८८ आरटी-पीसीआर टेस्ट करण्यात आल्या. या टेस्टमधून २ खेळाडूंसह १३ जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. याआधी चेन्नईच्या टीमचे १३ सदस्य कोरोना टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली होती.

या कोरोना टेस्टमध्ये जे खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत, त्यांच्यामध्ये भारतीय टीममधला एक टी-२० स्पेशलिस्ट बॉलर आहे, तर दुसरा भारत ए कडून खेळणारा वरच्या फळीतला बॅट्समन आहे. बीसीसीआयने या दोन्ही खेळाडूंच्या नाव अधिकृतपणे जाहीर केली नाहीत.

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार पॉझिटिव्ह आलेल्या १३ लोकांच्या जे संपर्कात आले, त्यांच्यात कोरोनाची लक्षणं दिसत नाहीयेत. आयपीएलच्या मेडिकल टीमकडून त्यांची काळजी घेतली जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

You might also like