Thane News : ट्रक आणि टेम्पोमध्ये झालेल्या धडकेत टेम्पो चालकासह दोघे जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

ठाणे : हॅलो महाराष्ट्र – गुरुवारी सायंकाळी ट्रक आणि टेम्पोमध्ये झालेल्या धडकेमध्ये चालक शोएब कुरेशी याच्यासह दोघेजण जखमी झाले आहेत. जखमींना ओवळा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हाची नोंद करण्यात आली आहे.

सविस्तर माहिती अशी कि, आज सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास मीरा रोड ते वाशीच्या दिशेने घोडबंदर रोडवरील गायमुख येथून हा टेम्पो निघाला होता त्यावेळी घोडबंदर ते मीरा रोडच्या दिशेने समोरुन आलेल्या एका ट्रकने या टेम्पोला जोरदार धडक दिली.

या अपघातात शोएब आणि एहतास मुलहक हे दोघेजण जखमी झाले आहेत. या अपघातामुळे रोडवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. वाहतूक शाखेने दोन्ही अपघातग्रस्त वाहने बाजूला करुन वाहतूक सुरळीत केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Leave a Comment