वाळूजमध्ये दोन अपघातात दोघांचा मृत्यू वाहनाच्या धडकेत तरुण जागीच ठार कंटेनरने दुचाकीला उडवले दुचाकीस्वार कामगार ठार

0
25
Tractor Accident
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वाळूज : व्यायामासाठी गेलेल्या तरुणाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. धनंजय बाबुराव चव्हाण (26, रा. तुर्काबाद) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली. धनंजय नियमितपणे व्यायाम करण्यासाठी कानात हेडफोन घालून तुर्काबाद आंबेलोहळ डांबरी रस्त्यावर निघाला होता. यादरम्यान, त्याला एका अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. यात तो जखमी होऊन रस्त्याच्या कडेला पडला. धनंजय च्या मित्राने घटनेची माहिती नातेवाईक व पोलिसांना दिली. त्यानंतर धनंजयला खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी मृत घोषित केले.

कंपनीतील काम आटोपून दुचाकीने घरी जात असताना कंटेनरने समोरून धडक दिल्याने जखमी झालेल्या सुभाष सोमीनाथ आरगडे (32 रा मनिषा नगर, वाळूज) या कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास क्रॉम्प्टन अँड ग्रीव्हीज या कंपनीसमोर घडली. घटनेनंतर कंटेनर चालक पसार झाला.

वाळूज औद्योगिक परिसरातील – 158, सेक्टरमधील ए. बी. इंजिनिअरिंग कंपनीत वायर कंटिंग ऑपरेटर म्हनून सुभाष आरगडे काम करतो. मंगळवारी काम आटोपल्यावर तो दुचाकीवर (एम एच 20 सी ए 7017) बसून वाळूज येथील घराच्या दिशेने जात असताना समोरून भरधाव आलेल्या कंटेनरने (एनएल 01जीं 0600) त्याच्या दुचाकीला धडक दिली. याद सुभाष खाली पडून जखमी झाला. कंटेनर चालक ने त्याला मदत न करता घटनास्थळावरून पळ काढला.दरम्यान,या मार्गे येता करणाऱ्या नागरिकांनी घटनेची माहिती वाळूज एमआयडीसी पोलिसांना दिली. पोलिस व नागरिकांनी 108 रुग्णवाहिकेतून त्याला घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.या प्रकरणी वाळूज एमआयडीसी ठाण्यातगुन्हा दाखल करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here