यशवंत जाधव यांच्या डायरीत आणखी दोन जणांची नावे; शिवसेनेत खळबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसापासून आयकर विभागाच्या रडारावर असलेले शिवसेना नेते आणि मुंबई महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या डायरीत मातोश्री शिवाय आणखी २ व्यक्तीची नावे समोर आली असून शिवसेनेत खळबळ उडाली आहे

यशवंत जाधव यांच्या डायरीत मातोश्रीनंतर आता केबलमॅन आणि एम ताई या नावाचा उल्लेख आढळला. त्यातील एक मंत्रिपदाशी संबंधित आहेत तर दुसरं नाव मुंबई महापालिकेतील सक्रीय असणाऱ्याचं आहे असा दावा केला जात आहे. यातील केबलमॅन या व्यक्तीला एक कोटी 25 लाख दिल्याचा उल्लेख केला आहे तर एम ताई या व्यक्तीला 50 लाख रुपये दिल्याचा उल्लेख आहे. टीव्ही९ मराठीने याबाबत वृत्त दिले आहे

दरम्यान, हे केबलमॅन आणि M-TAI असा उल्लेख असणारे व्यक्ती कोण याबद्दल अद्याप समजू शकले नाही. मात्र, या नावावरून वेगवेगळे तर्क वितर्क लढवले जात आहेत. आयकर विभागाकडून या २ व्यक्तींनाही समन्स जाऊ शकतो. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामुळे शिवसेनेच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे

तत्पूर्वी मागील महिन्यात सापडलेल्या यशवंत जाधव यांच्या डायरीत दोन कोटी रुपये आणि पन्नास लाख रुपयांच्या घड्याळ मातोश्रीला दिल्याचे लिहिले होते . मात्र मातोश्री म्हणजे आपली आई असा उल्लेख असल्याचा दावा यशवंत जाधव यांनी केला होता