वसईत दरड कोसळली : दोनजण अडकले; युद्धपातळीवर बचावकार्य सुरु

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वसईच्या राजवली वाघरल पाडा येथील परिसरात आज सकाळी दरड कोसळल्याची घटना घडली. या दरडीखाली 6 जण अडकले होते. त्यापैकी 4 जणांची सुटका करण्यात यश आले आहे. तर तर बाप-लेक असे दोघेजण अजूनही दरडीखालीच अडकलेले आहे. वालीव पोलीस आणि वसई विरार महापालिका अग्निशमन दलाचे जवान दुर्घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून बचावकार्य सुरु आहे.

याबाबात अधिक माहिती अशी की, सध्या सर्वत्र अतिवृष्टी होत असल्यामुळे दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. दरम्यान वसई राजवलीच्या वाघरल पाडा या परिसरात आज दरड कोसळल्याची घटना घडली. अचानकपणे दरड खाली आल्याने त्याच्याखाली 6 जण अडकले त्यानांतर या ठिकाणी तत्काळ आपत्तीची व्यवस्थापन पथकाचे अधिकारी, कर्मचारी दाखल झाले असून त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन राबविले. त्यातून चार जणांना बाहेर काढले आहे.

अद्यापही दरडीखाली दोघेजण अडकले असून त्यामध्ये बाप लेकाचा समावेश आहे. त्यांनाही बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. स्थानिक पोलीस, वसई विरार महापालिका अग्निशमन दलाच्या साहाय्याने रेस्क्यू ऑपरेशन राबविले जात आहे.

Leave a Comment