मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर बंदुकीचा धाक दाखवत शिवसैनिकाने केला ओव्हरटेक; व्हिडीओ शेअर करत एमआयएम खासदारांनी केली कारवाईची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केला आहे. जलील यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या या व्हिडीओमुळे सोशल नेटवर्किंगवर एकच खळबळ उडली आहे. हा व्हिडीओ मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावरील (एक्सप्रेस-वे वरील)असल्याचा दावा जलीली यांनी केलाय. काही शिवसैनिकांनी वाहनांच्या रहदारीतून मार्ग काढण्यासाठी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर पिस्तूल दाखवल्याचा आरोप जलील यांनी केलाय. तसेच, गाडीवरचा शिवसेनेचा लोगोच सगळं काही सांगत असून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे अशा प्रकाराची दखल घेणार का?, असा सवालही जलील यांनी केला आहे.

“हे दुष्य महाराष्ट्रातील पुणे-मुंबई द्रुतगतीमार्गावर आहे. वाहनवरील लोगो सर्व काही सांगत आहे. शुक्रवारी रात्री शिवसैनिक त्यांच्या गाडीसाठी मार्गक्रमण करीत असताना रिव्हॉल्व्हर्सचे ब्रँडिंग करीत होते. गृहमंत्री /पोलीस महानिरीक्षक या अधर्मची दखल घेऊ शकतात का?”,असा प्रश्न जलील यांनी उपस्थित केला आहे. या ट्विटमध्ये जलील यांनी गृहमंत्री अनिल देशमुख आणि महाराष्ट्र पोलिसांच्या डीजीपींनाही टॅग केलं आहे

 

 

नक्की काय आहे या व्हिडिओत –

या व्हिडीओमध्ये ट्रकच्या गर्दीमधून वाट काढण्यासाठी एक कारचालक ड्रायव्हिंग सीटवरुन उजव्या हातात पकडलेली रिव्हॉलव्हर गाडीच्या खिडकीबाहेर काढतो आणि ट्रकच्या रांगेमधून पलीकडच्या लेनमध्ये जाताना दिसतो. या गाडीच्या मागच्या काचेवर शिवसेनेचा लोगो असल्याचे व्हिडीओत दिसून येत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment