दक्षिण आफ्रिकेच्या दोन क्रिकेटपटूना कोरोनाची लागण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोरोनाने सध्या जगभर धुमाकूळ घातलाय.जगभरात अनेक लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. अशातच आता दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघातील दोन खेळाडूंना करोनाची लागण झालेली आहे. त्यामुळे हे दोन्ही खेळाडू दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठी आयोजित करण्यात आलेल्या कँपमध्ये सहभागी होऊ शकणार नाहीयेत. दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाने या दोन्ही खेळाडूंची नावं जाहीर न करण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्त ESPNCricinfo ने दिलं आहे.नुकतच दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाने खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ मिळून ५० जणांची चाचणी केली होती. ज्या चाचणीत दोन खेळाडूंना करोनाची लागण झाल्याचं समजतंय.

कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर दोन्ही खेळाडूंना क्वारंटाइन करण्यात आलेलं असून डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. वर्णद्वेशावरुन आफ्रिन खेळाडूंमध्ये सुरु झालेल्या वादावर चर्चा करण्यासाठी दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने आपल्या खेळाडूंसाठी एका सांस्कृतिक कँपचं आयोजन केलं होतं. २२ ऑगस्टपर्यंत हा कँप सुरु राहणार आहे. परंतु या खेळाडूंची नावं जाहीर न करण्याचा निर्णय आफ्रिकन क्रिकेट बोर्डाने घेतला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment