बांदीपोरात जवान आणि दहशतवादी यांच्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

0
54
Indian Army
Indian Army
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

श्रीनगर | सतिश शिंदे सीमारेषेवर पाकिस्तानकडून होणाऱ्या कुरापती दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. शुक्रवारी २१ सप्टेबर जम्मू काश्मिरमधील बांदीपोरामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यावेळी दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आले आहे. बांदीपोरा परिसरात दहशतवादी लपल्याची शक्यता असल्याने लष्कराकडू शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.

सीमारेषेवर पाकिस्तानकडून होणाऱ्या कुरापती दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. शुक्रवारी २१ सप्टेबर जम्मू काश्मिरमधील बांदीपोरामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यावेळी दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आले आहे. बांदीपोरा परिसरात दहशतवादी लपल्याची शक्यता असल्याने लष्कराकडू शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.

मागील काही दिवसांपासून काश्मीरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांकडून पोलीसांना सतत टार्गेट केले जात होते. याच पार्श्वभूमीवर, गुरुवारी रात्रीपासून शोपियान जिल्ह्यातून चार पोलीस कर्मचारी बेपत्ता झाल्याची माहिती समोर आलेली होती. पोलीस बेपत्ता होण्यामागे दहशतवाद्यांचा हात असल्याचे बोलले जात आहे. संशयित दहशतवाद्यांनी या चार पोलीसांचं अपहरण केल्याची माहिती समोर आलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here