आंबेनळी घाटात मित्राच्या लग्नाला निघालेल्या दुचाकीस्वारांचा अपघातात मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सकलेन मुलाणी । महाबळेश्वर सातारा

पोलादपूर महाबळेश्वर राज्यमार्गावर आंबेनळी घाटात मित्राच्या लग्नाला निघालेल्या दुचाकीस्वाराला एसटी बसची मागील बाजू लागून अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याने त्याला पोलादपूर रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आली होते. मात्र उपचारादरम्यान जखमी दुचाकीस्वराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या युवकाला पोलादपूर येथे शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात आले. मात्र तेथील वैद्यकीय अधीक्षक आणि शवविच्छेदन करणारे कर्मचारी उपस्थित नसल्याने खासगी ठिकाणी शवविच्छेदन करावे लागल्याने नातेवाईकांना ताटकळत बसावे लागले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सुरज चंद्रकांत भिलारे (वय २७ रा. भिलार ता. महाबळेश्वर) हा तरुण युनिकॉर्न मोटर सायकल क्रमांक (एम. एच. ०२ डीसी- ७११०) घेऊन भिलार – माणगाव असा मित्राच्या लग्नासाठी जात असता. आंबेनळी घाटात चिरे खिंड गावच्या हद्दीत आला असता याच दरम्यान महाड अक्कलकोट एसटी बस क्रमांक (एम. एच २०/३०६९) ही जात असताना एसटी बसची मागील बाजू मोटार सायकल लागल्यामुळे दुचाकीस्वार खाली पडल्याने त्याला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली. त्याला पोलीस व स्थानिकांनी पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र दुर्दैवाने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.

या घटनेची माहिती पोलादपुर पोलिसांना समजतात पोलीस हवालदार आशिष नटे व सहकारी यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला आहे. या अपघाताची नोंद पोलादपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे अधिक तपास आशिष नटे हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.
दरम्यान सदर अपघात दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर पोलादपूर ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक ह्या अनुपस्थित असल्याने आणि शवविच्छेदन करणारे हे देखील अनुपस्थित असल्यामुळे दुपारी २.३० वाजेपर्यंत शवविच्छेदन न होऊ शकल्याने मयताचे चे नातेवाईक श्रीकांत भिलारे व इतर नातेवाईक यांना काही काळ ताटकळत राहावे लागले. यावेळी श्रीकांत भिलारे यांनी आरोग्य यंत्रणेला जाब विचारत आरोग्य यंत्रणेवर संताप व्यक्त केला.

यानंतर स्थानिक पत्रकारांनी पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन उपस्थित डॉक्टर श्रीमती डॉ. कांबळे मॅडम यांना विचारणा केली असता महाड येथून शव विच्छेदन करण्यासाठी कर्मचारी बोलावले असल्याचे सांगण्यात आले मात्र दुपारपर्यंत सदर कर्मचारी न पोचल्याने मयताच्या नातेवाईकांनी व स्थानिक पत्रकारांनाही आरोग्य यंत्रणेला विचारणा केली.शेवटी खाजगी शव विच्छेदन करणारे यांना बोलून शव विच्छेदन करून बॉडी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आली आहे.पोलादपूर ग्रामीण रुग्णालयातील अशा घटनांबाबत वैद्यकीय अधीक्षक यांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment