फोर्च्युनर अन् क्रेटा अशा दोन गाड्या एकाचवेळी दुचाकीस्वाराला धडकल्या; त्यानंतर…(Video)

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात शुक्रवारी एक विचित्र अपघात झाला. दोन फोरव्हिलर गाड्यांना एका दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपसार सुरु आहेत. सौरभ मोहिते वय २२ वर्षे असं जखमी तरुणाचं नाव आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, डॉ. सखा पाटील यांची चारचाकी गाडी क्र MH20 BQ 3555 गजानन महाराज मंदिर रोड वरील राधाकृष्ण मंगल कार्यालय जवळ वळण घेत असतांना समोरुन आलेल्या गाडी क्र MH20 EJ 5401 या दुचाकीस्वाराने त्यांना जोरदार धडक दिली. तेवढ्यात समोरुन रिलायंस मॉल कडून राधाकृष्ण मंगल कार्यालय कडे जाणार्‍या हिरालाल राठोड यांच्या MH20 FP 2727 (फोर्चयूनर) या गाडीनेही जोरदार धडक दिली. यामध्ये सौरभ मोहिते वय २२ वर्षे हा तरुण गंभीर जखमी झाला.

प्रत्यक्ष दर्शी असलेल्या लोकांनी अपघाता विषयी सांगितले कि हा अपघात इतका भयंकर होता कि क्रेटा गाडी चे एअर बॅग ओपन झाले होते . या अपघातात सौरभ हा गंभीर जखमी झाला आहे आणि त्याला रुगणालयात भरती करण्यात आले आहे.

सध्या तरी या अपघातामुळे कुठली हि जीवितहानी झाली नाही. सदरील घटनेची तक्रार जवाहरनगर पोलीस ठाण्यात नोंदवली गेली आहे. नेहमीच या रस्त्यावर वर्दळ असते आणि अशाच प्रकारचे अपघात घडत असतात असं येथील नागरिकांनी सांगितले.

हे पण वाचा –

धक्कादायक! करोनामधून बरे झालेले रुग्ण पडत आहेत ‘या ‘ गंभीर आजाराचे बळी; जाणून घ्या काय सांगतो रिसर्च

राज्यात कोरोनाची तिसरी लाट येणार? मुख्यमंत्र्यांनी दिले ‘हे’ आदेश

पोस्टाच्या ‘या’ योजना माहित आहेत का ? मिळेल गॅरंटीड रिटर्न, जाणून घ्या व्याज दर

तुम्ही मला बुधवार पेठेत कधी पाहिलं? अशा शब्दांत मानसी नाईकने युझरला सुनावले खडे बोल

1 मे पासून गॅस सिलेंडर पासून बँकिंग नियमांपर्यंत ‘हे’ 5 नियम बदलणार, त्यात कोणते मोठे बदल होईल ते जाणून घ्या

Leave a Comment