घराजवळ फिरणार्‍या वृध्देची तीन तोळ्याची सोन्याची साखळी दुचाकीस्वारांनी पळवली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | शहरात चोरीचे सत्र सुरूच आहे. काही दिवसापूर्वी वट सावित्री पौर्णिमेला तीन महिलांचे मंगळसूत्र गेले होते. सोमवारी पुन्हा एकदा घराजवळच्या परिसरात फिरणाऱ्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील तीन तोळ्याची सोनसाखळी चोरट्यांनी बाईकवर येऊन पळविल्याची घटना समोर आली आहे. ही घटना उस्मानपुरा येथील जयानगरमध्ये काल संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली.

उज्वला वागळे, वय 84 वर्ष, या घराजवळील परिसरात रोज संध्याकाळी पायी फिरत असतात. सोमवारी देखील त्या पायी फिरत असताना स्पोर्ट्स बाईकवर दोन दुचाकीस्वार आले आणि त्यांच्या गळ्यातील तीन तोळ्याची सोनसाखळी हिसकावून पळून गेले.

या घटनेची माहिती मिळताच उस्मानपुरा पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. नातेवाईकांसह वागळे यांनी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात जाऊन या घटनेची तक्रार केली आहे.

Leave a Comment