लोकल ट्रेनमधील जागेवरून महिलांमध्ये तुफान हाणामारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईच्या लोकल म्हणजे मुंबईतील लोकांची लाईफलाईन. या लोकलमध्ये तुफान गर्दी असते कधी कधी तर यामध्ये लोकांना पाय ठेवायला जागा नसते. त्यामुळे रोज कुणाचे ना कुणासोबत लोकलमध्ये खटके (two women fight over seat) उडत असतात. अशीच एक घटना लोकलमधील लेडीज डब्यात घडली आहे. यामध्ये तीन तरुणींमध्ये लोकलमध्ये बसण्याच्या जागेवरून हाणामारी (two women fight over seat) झाली आहे. या हाणामारीचा (two women fight over seat) व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

काय आहे संपूर्ण प्रकार?
या व्हिडीओत आधी दोन तरुणी नंतर तीन तरुणी हाणामारी (two women fight over seat) करताना दिसत आहेत. या तरुणींमध्ये बसण्याच्या जागेवर हाणामारी झाली. बसायच्या सीटवरून दोन तरुणी आपआपसात भिडल्या. एकीने दुसरीच्या झिंज्या ओढल्या. त्यानंतर तिच्या कानाखाली ओढली. हे पाहून तिसरी महिला या भांडणात आली आणि दोघींनी मिळून पहिल्या तरुणीला बेदम चोप (two women fight over seat) दिला. या डब्यातील बाकी महिलांनी बघ्याची भूमिका घेतली. हे भांडण सोडवायला कुणीही मध्ये पडले नाही.

यापूर्वीदेखील घडली होती अशीच घटना
काही दिवसांपूर्वी ठाण्यातील टिटवाळा या ठिकाणीदेखील लोकलमध्ये बसण्याच्या जागेवरून काह महिलांमध्ये जोरदार हाणामारी (two women fight over seat) झाली होती. हे भांडण सोडवण्यासाठी नेरूळ वरून महिला पोलीस कर्मचारी या ट्रेनमध्ये चढल्या असता त्यांना देखील या मारहाणीत दुखापत झाली. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

हे पण वाचा :
अंधेरीचा पहिला झटका … मशाल पेटली; सामनातून भाजपवर टीकेचा बाण
जालन्यामध्ये आयशर आणि रिक्षाचा भीषण अपघात! 5 जणांचा जागीच मृत्यू
5 रुपयांच्या ‘या’ नोटेद्वारे अशा प्रकारे मिळवा लाखो रुपये
Honda पुढील महिन्यात ACTIVA Electric करणार लाँच, जाणून घ्या फीचर्स, किंमत अन् बरंच काही…
VIP मोबाईल नंबर ‘फ्री’ मध्ये मिळवण्याची संधी