धक्कादायक ! सोशल मीडियावरील चॅटिंगवरुन दोन तरुणांची निर्घृणपणे हत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली : हॅलो महाराष्ट्र – सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील उमदी या ठिकाणी मध्यरात्री 12 वाजता मंगळवेढा रोडवर दोन गटात तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत दोन तरुणांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. तर एका तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे. या जखमी तरुणाला सोलापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

सोशल मीडियावरील चॅटिंग पडली महागात
सोशल मीडियावर चॅटींग केल्याचा राग मनात धरून तरुणांची हत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. टोळी युद्धाच्या वर्चस्ववादातून हा सगळा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सात संशयित आरोपींना अटक केली आहे. उमदी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या दोन गटांत झालेल्या हाणामारीत गुंडा उर्फ मदगोंडा बगली आणि संतोष राजकुमार माळी या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर प्रकाश परगोंड हा तरुण गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याला उपचारांसाठी सोलापुरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सांगलीत टोळी युद्ध भडकले!
मागच्या काही महिन्यांपासून उमदी याठिकाणी दोन टोळ्यांमध्ये वर्चस्वाचा संघर्ष सुरू होता. याच वादातून बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास दोन गटात उमदी शहरापासून पंढरपूर रोडवर तुंबळ हाणामारी झाली, ज्यांमध्ये दोन जणांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे उमदीसह जत तालुका हादरून गेला आहे. उमदीपासून दोन किलोमीटर अंतरावर उमदी ते पंढरपूर मंगळवेढा हायवेवर ही घटना घडली आहे. उमदी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Comment