पोहायला गेलेल्या दोन तरुणांचा शेततळ्यात बुडून मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद :  सांगवी येथील असलेल्या शेततळ्यात दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी सकाळी घडली. शेख अस्लम मोहमद साकी नियाजी (वय २२) शेख साजिद शेख याकूब (वय २४) असे मृत तरुणांचे नाव असून फुलंब्री पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद केली आहे.

हे दोघेही तरुण सकाळी साडे सहाच्या सुमारास पोहण्यासाठी शेततळ्याकडे गेले होते, दोघेही तळ्यात उतरले मात्र पाण्याचा अंदाज न समजल्याने दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. फुलंब्री पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक बाबासाहेब कांबळे , सुरेश दौड, पांचगे यांनी घटनास्थळी दाखल होवून अग्निशमन यंत्रणेला कळवण्यात आले.

दोन्ही तरुणांचे मृतदेह तलावातून बाहेर काढून घाटी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवले. मृतदेह शेततळ्यातुन बाहेर काढण्यासाठी मुख्य अग्निशमन अधिकारी आर. के.सुरे, उपअग्निशमन अधिकारी शरद घाटेशाही आदींच्या मार्गदर्शनाखाली मृतदेह बाहेर काढण्यात आले. यासंदर्भात फुलंब्री पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Comment