धक्कादायक ! एकमेकांच्या हाताला दोरी बांधून अल्पवयीन प्रेमीयुगुलाची नदीत उडी घेऊन आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

गडचिरोली : हॅलो महाराष्ट्र – गडचिरोली तालुक्यातील आरमोरी या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. मागच्या 5 दिवसांपासून बेपत्ता असणाऱ्या अल्पवयीन प्रेमीयुगालाचा मृतदेह शिवनी घाटावर आढळला आहे. हि घटना शनिवारी सायंकाळी घडली आहे. या दोघांनीही एकमेकांच्या हातात दोरी बांधून गडचिरोली येथील वैनगंगा नदीत उडी घेतली होती, त्यामुळे हाताला दोरी बांधलेल्या अवस्थेत दोघांचे मृतदेह आढळले आहेत. हि घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. संबंधित अल्पवयीन मुला-मुलीनं प्रेमप्रकरणातून हे टोकाचं पाऊल उचलले असल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

आत्महत्या करण्याऱ्या अल्पवयीन मुला-मुलीचं नाव स्वाती दिलीप मेश्राम आणि आशिष प्रभू मेश्राम असे आहे. हे दोघेही चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी तालुक्यातील चिंचोली बुजुर्ग येथील रहिवासी आहेत. या दोघांनी प्रेम प्रकरणातून ही आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून घटनेचा पुढील तपास सुरु केला आहे. मृत स्वाती आणि आशिष 3 ऑगस्टपासून बेपत्ता होते. याप्रकरणी दोघांच्याही कुटुंबीयांनी ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी या घटनेची गांभीर्यानं दखल घेत, तातडीनं शोधमोहीम राबवली होती. पण दोघांचा काहीही ठावठिकाणा लागला नाही. तरीसुद्धा पोलीस या दोघांचा शोध घेत होते. पण त्यांना याच्याबद्दल कोणतीही माहिती मिळत नव्हती. यादरम्यान काल स्वाती आणि आशिषचा मृतदेह आरमोरी तालुक्यातील शिवणी घाटावर आढळला आहे. या दोघांनी एकमेकांच्या हाताला दोरी बांधून वैनगंगा नदीत उडी घेतली असावी, त्यामुळे दोघांचे मृतदेह हाताला दोरी बांधलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. या दोघांच्या आत्महत्येमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Comment