तुमची कोणी गर्लफ्रेंड आहे का? एका मुलीच्या प्रश्नावर राहुल गांधी म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।राहुलजी “तुमची कोणी गर्लफ्रेंड आहे का, असा प्रश्न तिने विचारला. या प्रश्नानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला, सर्वांच्या नजरा राहुल गांधी काय बोलणार याकडे लागल्या होत्या. मात्र, या प्रश्नाचे उत्तर मी नंतर कधीतरी देईन, असे सांगत राहुल गांधी यांनी वेळ मारून नेली.

काँग्रेस नेते आणि कोझिकोडेचे खासदार राहुल गांधी हे सध्या दक्षिणेतील राज्यांच्या दौऱ्यावर आहेत. काही दिवसांपूर्वीच पुद्दुचेरी येथे त्यांचा कार्यक्रम झाला होता. राहुल गांधी हे पुदुचेरीत एका कार्यक्रमासाठी गेले होते. यावेळी त्यांनी शाळकरी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमासाठी राहुल गांधी यांनी नेहमीचा पांढरा सदरा-कुर्ता हा पोशाख बाजूला सारून जीन्स आणि टी-शर्ट घातला होता. यावेळी एका लहान मुलीने राहुल गांधींच्या वर्मावर बोट ठेवले.आणि प्रश्न विचारला की राहुलजी “तुमची कोणी गर्लफ्रेंड आहे का.यावर राहुल गांधीनी वेळ मारत उत्तर दिलें.

त्याच बरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी निरुपयोगी आहेत की उपयोगी आहेत,असा प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले की हा प्रश्नच नाही. ते कोणासाठी उपयोगी आहेत, हा खरा चर्चेचा मुद्दा आहे, असे राहुल यांनी म्हटले. मोदी हे देशातील नागरिकांसाठी निरुपयोगी असले तरी देशातील दोन व्यक्तींसाठी ते खूपच कामाचे आहेत. मात्र, याच दोन व्यक्ती आपलं काम झालं की त्यांना कचऱ्यासारखं फेकून देतील, असे देखील राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

You might also like