पलटी! मोफत कोरोना लसीच्या घोषणेवरून केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचा यु-टूर्न, म्हणाले..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । केवळ दिल्लीतीलच नव्हे तर संपूर्ण देशातील जनतेाल कोरोनाची मोफत लस देण्याच्या घोषणेवरून केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी अवघ्या अर्ध्या तासातच घुमजाव केलं आहे. काही ठरावीक लोकांनाच कोरोनाची लस मोफत मिळणार असल्याचं ट्विट डॉ. हर्षवर्धन यांनी केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. (Don’t believe in rumours against vaccine says Dr. Harsh Vardhan)

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी कोरोनाची लस किती टप्प्यात वितरीत केली जाईल याची माहिती दिली आहे. पहिल्या टप्प्यात 3 कोटी लोकांना कोरोनाची लस मोफत दिली जाईल. त्यात 1 कोटी आरोग्य कर्मचारी आणि दोनन कोटी फ्रंटलाईन वर्करचा समावेश असेल.

प्राथमिकता यादीतील इतर 27 कोटी लोकांना जुलैपर्यंत लस देण्यात येणार आहे. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे, असं हर्षवर्धन यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे कोरोनाची लस आल्या आल्या सामान्य लोकांना ही लस मोफत मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

काय म्हणाले डॉ.हर्षवर्धन?
डॉ. हर्षवर्धन आज सकाळी गुरु तेग बहादूर सिंग रुग्णालयात आले होते. यावेळी त्यांना कोरोनाची लस दिल्लीतील जनतेलाच मोफत मिळणार आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर केवळ दिल्लीतच नव्हे तर संपूर्ण भारतातील जनतेला ही लस मोफत देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. चार राज्यात लसीकरणाबाबतचं ड्राय रन घेण्यात आलं असून त्याचा फिडबॅक मिळाला आहे. लसीकरणाच्या नव्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या होत्या. त्यात सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात आज ड्राय रन घेण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार हे ड्राय रन सुरू असून यावेळी नियमांचं पालन केलं जात आहे, असं त्यांनी सांगितलं होतं. (Don’t believe in rumours against vaccine says Dr. Harsh Vardhan)

लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. व्हॅक्सीन सुरक्षित ठेवण्यावर आमचा भर आहे. पोलिओ लसीकरणाच्यावेळी अनेक प्रकारच्या अफवा पसरल्या होत्या. तरीही लोकांनी लस टोचून घेतली आणि भारत पोलिओमुक्त झाला होता, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. देशाला लसीकरणाचा अनुभव आहे. कोरोनाची लस जनतेच्या सुरक्षेसाठी आहे. त्यामुळे कोणत्याही चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका, असं आवाहनही त्यांनी केलं होतं. पण अवघ्या अर्धा तासातच हर्षवर्धन यांनी पलटी खाल्ल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. (Don’t believe in rumours against vaccine says Dr. Harsh Vardhan)

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment