सातारा प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी यावर्षी आपला वाढदिवस साजरा करणार नसल्याचे सांगितले. येत्या २४ फेब्रुवारी ला उदयनराजे यांचा वाढदिवस आहे, मात्र पुलवामा येथे जवानांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आपण यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे असे त्यांनी सांगितले.
आपल्या कार्यकर्त्यांना यासाठी त्यांनी विशेष सूचना दिल्या आहेत. त्यानुसार वाढदिवासाचे शुभेच्छा फलक साताऱ्यातच नव्हे तर महाराष्ट्रात कुठेही लावू नये. तसेच हार-पुष्पगुच्छ , इतर भेटवस्तू देऊ नये,असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
पुलवामा येथील जवानांवर झालेल्या हल्ल्याने जवानांच्या कुटुंबियांवर मोठा आघात झाला आहे.या जवानांनी भारतासाठी वीर मरण स्वीकारले,त्यामुळे संपूर्ण देशाने त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे.आम्हाला वाढदिवसाचं औचित्य फार नाही.वाढदिवस येतील आणि जातील,पण आज जवानांच्या दुःखात सहभागी होता यावं यासाठी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. असे कार्यकर्त्यांना उद्देशून लिहिलेल्या पात्रात त्यांनी म्हटले आहे.
इतर महत्वाचे –
पानसरे यांच्या हत्येचा तपास संथ गतीने होत असल्याने निषेध
लोकसभेच्या रिंगणात मी आणि सुप्रियाचं…शरद पवार