कराड : खासदार उदेनरजे भोसले यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अन् उदयसिंह पाटील उंडाळकर यांची कराड येथे भेट घेतली. जिल्हा बँकेच्या निवडणुकिमुळे राजकिय वातावरण आता तापले आहे. तसेच जिल्ह्यातील राजकिय घडामोडींनाही वेग आला आहे. उंडाळकर यांच्या शी कमराबंद बैठकीनंतर पत्रकारांनी उदयनराजे भोसले यांना बोलता करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना त्यांच्या स्टॉईलने उत्तरे दिली. यावेळी बोलताना मी माझ्या बंधूना गेली अनेक दिवस झाले सांगतोय मी तुमच्यासोबत आहे अस विधान भोसले यांनी केले.
तसेच, मला कधी जिल्ह्यातल्या राजकारणात ढवळाढवळ करताना पाहिले का ? पण माझा विषय आला की सगळे ढवळा ढवळ करतात. आता मी ढवळा ढवळ करु का ? असा सवाल करत उदयनराजे भोसले यांनी फटकेबाजी केली. तसेच मी माझ्या बंधूना गेली अनेक दिवस झाले सांगतोय मी तुमच्यासोबत आहे. पण त्यांच्या लक्षात येत नाही असं म्हणत उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना टोला लगावला.
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/191017766540936
दरम्यान, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सोसायटी गटातूनटातून तर गृहनिर्माण मधून सहकार मंत्री यांचे बंधू जयंत पाटील यांनी अर्ज दाखल केले आहेत. या पार्श्वभूमीवर उदयनराजे भोसले व उदयसिंह पाटील यांची कमरबंध चर्चा ही जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व महत्त्वाचे मानले जात आहे तसेच उदयसिंह पाटील हे सध्या काँग्रेसमध्ये असून त्यांच्या भेटी अगोदर काँग्रेसचे मोठे नेते पृथ्वीराज चव्हाण यांची ही उदयनराजे भोसले यांनी भेट घेतली आहे. या भेटीमुळे कराड जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे