शिवसैनिक राज्यसभेत जाऊ नये यासाठी काँग्रेस- राष्ट्रवादीने बंदोबस्त केला; बंडखोर उदय सामंत यांचा आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यसभा निवडणुकीत शिवसैनिक असलेले संजय पवार निवडुन येऊ नये म्हणून काँग्रेस- राष्ट्रवादीने प्रयत्न केले असा गंभीर आरोप बंडखोर आमदार उदय सामंत यांनी केला. तसेच मी कायम शिवसेनेतच आहे आणि राहीन, शिवसैनिकांनी गैरसमज करू नये असं आवाहन त्यांनी केलं. उदय सामंत यांनी व्हिडिओ शेअर करत आपलं मत व्यक्त केले.

मी शिवसेनेतच आहे. पण काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस या आपल्या मित्रपक्षांच्या वागण्यामुळे बाळासाहेबांच्या, उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेला वाईट नजर लागली आहे. त्या वाईट नजरेतून शिवसेनेला बाहेर काढण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्न करत आहेत.म्हणून मी त्यांच्या समर्थनार्थ गुवाहाटी मध्ये आलो आहे अस उदय सामंत यांनी म्हंटल.

राज्यसभा निवडणुकीत संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी नाकारून पक्षाने एका सच्चा शिवसैनिकाला राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला, मात्र त्या निवडणुकीत देखील हा उमेदवार निवडून येऊ नये म्हणून मित्रपक्षांनी प्रयत्न केले.  त्यामुळेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेले हिंदुत्व पुढे घेऊन जाणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. अस उदय सामंत म्हणाले.

पण काहीही असलं तरी मी आजही शिवसेनेतच आहे. आणि शिवसेनेतच राहीन. त्याबद्दल सर्वसामान्य शिवसैनिकांनी कोकणातील जनतेने कोणताही गैरसमज करून घेऊ नये, असे उदय सामंत यांनी म्हटलं आहे

 

Leave a Comment