राज्यात महाविद्यालये कधी सुरु होणार? उच्च तंत्रशिक्षण मंत्री सामंत यांनी दिली ‘हि’ महत्वाची माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनामुळे राज्य सरकारच्यावतीने महाविद्याल्ये बंद ठवण्यात आली होती. त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसानही झाले. आता महाविद्यालये सुरु करण्याबाबत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महत्वाची माहिती दिली आहे. ‘अजून महिनाभर तरी महाविद्यालये सुरु केली जाणार नाहीत. मात्र, महाविद्यालये सुरु करण्याअगोदर प्रॅक्टिकल परीक्षा घेतल्या जातील, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी वर्धा येथे आज पत्रकार परिषद घेत राज्यातील शाळा, महाविद्यालये सुरु करण्याबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी ऑनलाईन शिक्षणाचा विषय सांगितला. त्याबाबत ते म्हणाले कि, ऑनलाईन शिक्षण प्रक्रियेची सोया असताना विध्यार्थी व शिक्षक यांच्यात आपापसात समन्वय असणे गरजेचे आहे. त्यांच्यात जर योग्य समन्वय असेल तर प्रॅक्टिकल करणे गरजेचे वाटत नाही. तसेच सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता तशी परिस्थितीही नाही. त्यामुळे शाळा, महाविद्यालये कधी सुरु होतील तेव्हा होतील. मात्र, अगोदर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याच्या प्रॅक्टिकल परीक्षा या नक्की होतील, असे सामंत म्हणाले.

यावेळी मंत्री सामंत म्हणाले कि, राज्यातील महाविद्यालये सुरु करणे म्हणजे एक मोठा समूह एकत्रित वर्गात आणण्यासारखे आहे. महाविद्यालये सुरु झाल्यास मोठ्या संख्येने विध्यार्थी एकत्रित येतील. जर ते एका जागी आले तर कोरोनाचा त्यांना धोका जाणवू शकतो. आणि कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते. त्यामुळे सध्या तरी महानाभर महाविद्यालये सुरु करण्याचा विचार केलेला नसल्याचे सामंत यांनी सांगितले.

Leave a Comment