शपथविधीच्या पूर्वसंध्येला उदयनराजेंनी घेतली प्रमोद सावंतांची भेट

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला चार राज्यात यश मिळाले. गोवा राज्यात भाजपने सत्ता कायम ठेवण्यात यश मिळवले आहे. आज भाजपचे गटनेते प्रमोद सावंत हे गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. शपथविधीच्या पूर्वसंध्येला साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी गोव्यात प्रमोद सावंत यांची भेट घेतली. तसेच त्यांचे अभिनंदनही केले. यावेळी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

गोवा विधानसभा सदस्यांनी प्रमोद सावंत यांच्यावर विश्वास व्यक्त करत पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे. दरम्यान आज प्रमोद सावंत दुसऱ्यांदा गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह गोव्यात जात प्रमोद सावंत यांची भेट घेतली. यावेळी भाजपचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांचेही विशेष अभिनंदन केले.

Private Ad 3rd Paragrah

यावेळी उदयनराजे भोसले यांनी त्यांना शुभेच्छाही दिल्या. “प्रमोद सावंत यांनी गेल्या पाच वर्षात गोव्याचा विकास आणि पर्यटन यावर भऱ दिला आहे. यापुढील काळात प्रमोद सावंत हे गोव्याचा विकास जोमाने करून गोव्यातील जनतेचा नक्की विश्वास संपादन करतील, असा विश्वास खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला.

हे मान्यवर राहणार शपथविधीला उपस्थित –

गोव्यातील शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. भाजपचे अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय निरीक्षक केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंग तोमर, गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित राहणार आहेत.