सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा येथील जलमंदिर निवासस्थानी खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते मर्दानी खेळ वर्ल्ड फेडरेशनच्या बोधचिन्हाचे नुकतेच अनावरण करण्यात आले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली होती.
जलमंदिर येथील निवासस्थानी नुकतीच शिवकालीन मर्दानी खेळांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. यावेळी छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याशी पदाधिकाऱ्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. चर्चेवेळी मर्दानी खेळांना शासकीय पातळीवरील मान्यता मिळावी आणि खेलो इंडियामध्ये, शालेय क्रीडा प्रकारात या खेळाचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली.
खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते मर्दानी खेळ वर्ल्ड फेडरेशन या जागतिक संघटनेच्या बोधचिन्हाचे जलमंदिर येथे अनावरण pic.twitter.com/ntiwOS2hco
— santosh gurav (@santosh29590931) March 7, 2023
यावेळी संबंधित मागण्याचा आपण योग्य पद्धतीने पाठपुरावा करू बसू मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आश्वासन उदयनराजे भोसले यांनी दिले. जलमंदिर येथील बोधचिन्हाचे अनावर प्रसंगी मर्दानी खेळ जागतिक महासंघाचे सर्व पदाधिकारी, खासदार उदयनराजे भोसले समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.