साताऱ्यात अमित ठाकरेंच्या भेटीवेळी खासदार उदयनराजेंनी दिला ‘हा’ सल्ला; म्हणाले की,

0
242
Amit Thackeray Udayanaraje Bhosale (1)
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

मनसे युवासेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी आज साता-यात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधी स्थळाची भेट देऊन पश्चिम महाराष्ट्राच्या दौ-याला सुरुवात केली. यावेळी त्यांनी शिवतिर्थावर नतमस्तक होऊन खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी अमित ठाकरेंच्या रूपाने माझा मुलगा घरी आल्यासारखे मला वाटले. अमित ठाकरेंप्रमाणे नव्या दमाच्या युवा वर्गातील नेत्याने पुढं आलं पाहिजे. त्यांनी जास्तीत जास्त समाजाची सेवा करावी,” असा सल्ला उदयनराजे यांनी अमित ठाकरेंना दिला.

अमित ठाकरेंच्या भेटीनंतर उदयनराजे भोसले यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, अमित ठाकरे यांच्याकडून पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला जात आहे. त्यांच्या दौऱ्याला आमच्याकडून शुभेच्छा आहेत. त्यांना जास्तीत जास्त उदंड आयुष्य लाभो अशी आम्ही इच्छा व्यक्त करतो.

राजकारणात अनेक समस्या पहायला मिळतात. कधी चांगल्या तर कधी वाईट. अशांकडे अमित ठाकरेंनी लक्ष देऊ नये. त्यांनी आपले कामी करत राहावे, असे उदयनराजे यांनी म्हंटले.