सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या वाढदिवसाला महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी त्यांची गळाभेट घेत शिवेंद्रराजेंच्या नावाच्या घोषणा दिल्या होत्या. नरेंद्र पाटील यांच्या या जादूच्या झप्पीनंतर रात्री उशिरा खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रराजे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत गळाभेट घेतली आणि जादूची पप्पी दिली.
यावेळी आमदार शशिकांत शिंदे यांनी देखील शिवेंद्रराजेंना जादूची पप्पी दिली. या कार्यक्रमात एका उत्साही कार्यकर्त्यानं उदयनराजे हिरा आहेत आणि शिवेंद्रराजे, शशिकांत शिंदे तुम्ही जोहरी आहात असं म्हणल्यावर, शिवेंद्रराजेंनी आम्ही कधी हिरा व्हायचं असं म्हणल्यावर एकच हशा पिकला.
काही दिवसांपूर्वी साताऱ्यात येऊन नरेंद्र पाटील यांनी शिवेंद्रराजे यांच्या बरोबर एकत्र मिसळ खात, उदयनराजेंना मिसळीच्या तरीचा झटका दिला होता. त्यानंतर आता नरेंद्र पाटलांनी वाढदिवसानिमित्त शिवेंद्रराजेंची गळाभेट घेत घोषणाही दिल्या. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र पाटील आणि शिवेंद्रराजे यांची वाढती जवळीक साताऱ्यातल्या वेगळ्या राजकीय समिकरणाची नांदी ठरु शकते.
शिवेंद्रराजेंना मीच निवडूण आणणार – उदयनराजे भोसले
पुरूषोत्तम जाधवांचा शिवसेनेत प्रवेश, उदयनराजे भोसलेंच्या विरोधात लढवणार लोकसभा
स्मिता आर आर पाटील यांना सांगली लोकसभा मतदार संघातून उमेदवारी द्या
उदयनराजे भोसले यांच्या विरोधात तृथीयपंथी उमेदवार रिंगणात