सातारा प्रतिनिधी। संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत यंदा राष्ट्रवादीचे घडय़ाळ सोडून भाजपाचे कमळ हाती घेणारे उदयनराजे यांची लढत माजी राज्यपाल आणि राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील यांच्याशी होणार आहे.
संपूर्ण देशाला आर्थिक मंदीची झळ बसत असतानाही उदयन राजे यांच्या उत्पन्नात मात्र लोकसभा निवडणुकीनंतर गेल्या पाच महिन्यांत दीड कोटींची भर पडली आहे. या राजघराण्याकडे सोने-हिऱ्याचे तब्बल ४० किलोचे दागिने आहेत. तर श्रीनिवास पाटील यांनी वादग्रस्त आदर्श गृहनिर्माण संस्थेस ६० लाखांचे कर्ज दिल्याचे समोर आले आहे.
उदयनराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केल्याने सातारा लोकसभा मतदार संघात पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी पाटील आणि उदयनराजे यांनी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या शपथपत्रातून ही माहिती पुढे आली आहे. उदयनराजेंच्या विरोधात उभे असलेले राष्ट्रवादीचे उमेदवार माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील हे सुद्धा गर्भ श्रीमंत आहेत. त्यांच्याकडे १० कोटींची जंगम तर ११ कोटींची स्थावर मालमत्ता आहे. शेती हा प्रमुख व्यवसाय असलेल्या पाटील कुटुंबाने दागदागिने, बँकांमध्ये ठेवी, कंपनीत गुंतवणूक केली असून मुंबईतील आदर्श गृहनिर्माण सोसायटीस ६० लाखांचे कर्ज दिल्याची नोंद या प्रतिज्ञापत्रात आहे.
इतर काही बातम्या –
म्हणुन आम्ही मुक्ताईनगरातून माघार घेतली, रोहिणी खडसेंना पाडण्यासाठी पवारांचा मास्टर प्लान
वाचा सविस्तर – https://t.co/PNUuTRxJfg@BJP4Maharashtra @MumbaiNCP @EknathKhadseBJP #MaharashtraElections2019 #Vidhansabha2019
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 9, 2019
गोपीनाथ मुंडेना पाडणारा ८२ वर्षांचा कार्यकर्ता संभाळतोय धनंजय मुंडेच्या प्रचाराची धुरा..!!
वाचा सविस्तर – https://t.co/cX2kBTWxbu@Pankajamunde @dhananjay_munde @DrPritamMunde #BJP #NCP @BJP4Maharashtra @ShivSena #Vidhansabha2019 #MaharashtraElections2019
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 9, 2019
कोथरूडची लढाई ही नेता विरुद्ध कार्यकर्ता अशीच; इथल्या निवडणुकीत काश्मीर कशाला पाहिजे? – किशोर शिंदे
वाचा सविस्तर – https://t.co/Bw1Xg9RsiD@NCPspeaks @BJP4Maharashtra @BJPLive @ChDadaPatil #kothrud #MaharashtraElections2019 #Vidhansabha2019
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 9, 2019