लोकांचा अंत बघू नका, एकदा का उद्रेक झाला तर कोण थांबवणार – मराठा आरक्षणाप्रश्नी उदयनराजे आक्रमक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनचा उद्घाटन सोहळा आज सातारा येथे होत आहे. यानिमित्त छत्रपती उदयनराजे भोसले,छत्रपती शिवेंद्रराजे भोसले एकाच मंचावर उपस्थित होते. दरम्यान यावेळी छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणावरून राज्य सरकार वर निशाणा साधला. लोकांचा अंत पाहू नका, एकदा जर उद्रेक झाला तर त्याला कोण थांबवणार असा सवाल करत त्यांनी राज्य सरकारला इशारा दिला.

उदयनराजे म्हणाले, मला नेत्यांना एकच विनंती करायची आहे की लोकांचा अंत पाहू नका, एकादा जर उद्रेक झाला तर त्याला कोण थांबवणार आणि हा उद्रेक नक्की होणार. दुसऱ्याचां लाभ काढून आम्हाला देऊ नका. सर्वांना न्याय दिला, मग आम्हाला का नाही? सर्वांना वाटतं मराठा समाज फार सधन आहे. मात्र, मराठा समाजातील मजुरांची, विद्यार्थ्यांची परिस्थिती फार वाईट आहे.जास्त मार्क मिळवूनसुद्धा अ‌ॅडमिशन मिळत नसेल तर हा मराठा समाजावरील अन्याय आहे. यांना कोणती भाषा कळते हे समजत नाही. लोकांनी मोर्चे काढले. तरी यांना कळत नाही अस म्हणत उदयनराजे यानी नाराजी व्यक्त केली.

यावेळी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी देखील राज्य सरकारला धारेवर धरले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं हे सर्वांनी मान्य करावं लागेल, ते कोर्टातही टिकवलं होतं. मात्र राज्य सरकारला ते टिकवता आलं नाही असा आरोप त्यांनी केला.

मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर राजकारण बाजूला ठेवून समाज म्हणून एकत्र येणं गरजेचं आहे.मराठा समाजातील प्रत्येकाने या गोष्टीवर विचार करणे गरज आहे.मराठा आरक्षणाच्या बाबतीत सर्वांनी राजकीय चौकट बाजूला ठेवण्याची गरज आहे अस आवाहनही शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment