Monday, January 30, 2023

उदयनराजे भोसले यांनी ठोकला पत्रकारांना सलाम, म्हणाले…

- Advertisement -

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

राज्यात सध्या कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. आरोग्य कर्मचारी, पोलीस, स्वच्छता कर्मचारी हे अशातही आपला जीव धोक्यात घालून स्वतःची जबाबदारी पार पाडत आहेत. तसेच यामध्ये पत्रकारही कुठे मागे नसून ते सर्व अपडेट आपल्याला घर बसल्या पोहोचवत आहेत. यापार्श्वभूवर भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार मित्रांचे कौतुक करत त्यांना सलाम ठोकला आहे.

- Advertisement -

संपूर्ण देशभरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना आपल्या तसेच रुग्णांच्या सेवेस तत्पर असणाऱ्या आरोग्य कर्मचारी तसेच पोलीस जवानांना सुद्धा मोठ्या प्रमाणात कोरोना संक्रमण झाले आहे ही खूप चिंतेची बाब आहे. त्याचप्रमाणे लोकशाही चा चौथा आधार स्तंभ असलेल्या पत्रकारिता क्षेत्रातील आपले पत्रकार मित्र सुद्धा कोरोना संक्रमणापासून वाचू शकले नाहीत, दिवस रात्र जनतेसाठी आपल्या वाचकांसाठी उन्ह, वारा, पाऊस तसेच नैसर्गिक आपत्ती असेल पत्रकार कधी मागे हटला नाही असे म्हणत उदयनराजे भोसले यांनी पत्रकारांचे कौतुक केले आहे. फेसबुकवर एक पोस्ट शेयर करून भोसले यांनी पत्रकार मित्रांचे कौतुक केले आहे. यावेळी भोसले यांनी एक व्हिडिओही पोस्ट केला आहे.

आपला जीव धोक्यात घालून प्रत्येक क्षणाची खबर आपल्यापर्यंत पोहचवणे याला पत्रकार आद्यकर्तव्य मानून जनतेला घरी राहून कोरोनावर मात करण्याचे आवाहनही करत आहेत. हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी खूप कौतुकास्पद व अभिमानास्पद आहे. सलाम आहे तुमच्या कार्यकर्तृत्वाला व तुमच्या धैर्याला. परंतु आपल्या व आपल्या कुटुंबाप्रती आमचे आपणास आवाहन राहील जसे तुम्ही फिल्ड काम करताना महाराष्ट्राला काळजी घेण्याचे आवाहन करता तसेच तुम्हीही स्वतःची काळजी घेऊन आपले कर्तव्य पार पाडा असे आवाहनही भोसले यांनी यावेळी केले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”