…सरळ गोळ्या झाडल्या पाहिजेत; सोलापूरकरांवर उदयनराजे भोसलेंची जोरदार टीका

0
2
Udayanraje Bhosle
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर (Rahul Solanpurkar) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेक ठिकाणी त्यांच्या विरोधात आंदोलने देखील केली आहेत. परंतु आता भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी या प्रकरणामध्ये उडी मारत एक मोठे विधान केले आहे. दिल्ली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सोलापूरकर यांच्या विधानावर जोरदार टीका केली आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना उदयनराजे भोसले म्हणाले की, “राहुल सोलापूरकर यांनी अतिशय विकृत विधान केले आहे. अशा प्रकारच्या वक्तव्यांनी समाजात तेढ निर्माण होण्याचा धोका असतो. महापुरुषांची बदनामी करणाऱ्यांना देशद्रोहाच्या कायद्याखाली कठोर शिक्षा झाली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशासाठी प्रेरणास्थान आहेत. जगभर त्यांची शिकवण मान्य केली जाते. महाराजांनी कधीही आपल्या तत्त्वांशी तडजोड केली नाही. अशा व्यक्तीबद्दल अश्लील आरोप करणं हा संतापजनक प्रकार आहे. हे केवळ शिवभक्तांसाठी नव्हे, तर संपूर्ण देशासाठी अपमानास्पद आहे”

त्याचबरोबर, “महापुरुषांचा अपमान करणाऱ्या विकृत लोकांना सरळ गोळ्या झाडल्या पाहिजेत. समाज अशा लोकांना वेचून ठेचला पाहिजे.” असे उदयनराजे यांनी म्हणले आहे. इतकेच नव्हे तर, “ज्या कोणाच्या चित्रपटात, नाटकात ते काम करत असतील, ती लोकांनी हाणून पाडली पाहिजेत. त्यांना गाडलं नाही, तर देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होईल,” असे उदयनराजे म्हणाले.

दरम्यान, सोलापूरकर यांच्या विधानाबाबत बोलताना उदयनराजे म्हणाले की, “अशा विकृत विचारसरणीच्या लोकांमुळेच जाती-धर्मांमध्ये द्वेष पसरतो. जर या प्रवृत्तीला वेळीच आळा घातला नाही, तर देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होईल. आम्ही यापूर्वीही अशा प्रकारच्या विधानांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली होती. अशा वक्तव्यांमुळे देशाचे तुकडे होण्याची वेळ येईल.” असे वक्तव्य करत उदयनराजे भोसले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.