उदयनराजे आणि रामराजे यांची सातारा विश्रामगृहात झाली अचानक भेट; अन्…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक – निंबाळकर व राज्यसभेचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले   सातारच्या शासकीय विश्रामगृहामधील कक्ष क्रमांक १ मध्ये रामराजे थांबले होते. त्यावेळी उदयनराजे यांनी तेथे जाऊन त्यांची भेट घेतली व दोघांमध्ये दिलखुलास गप्पा झाल्या.

रामराजे व उदयनराजे यांच्यामध्ये गेली अनेक महिने वितुष्ट होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी दोघांमधील वाद विकोपाला गेले होते. राष्ट्रवादीमध्ये असणारे उदयनराजे अचानक खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये गेले. लोकसभेच्या पोटनिवडणुकीत प्रचरावेळी खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत पावसाच्या सभेत रामराजे यांनी उदयनराजे यांच्यावर टीका  केली होती. लोकसभेच्या या निवडणुकीत उदयनराजे यांचा पराभवही झाला होता.

उदयनराजे व रामराजे यांच्यामधील वाद जिल्ह्याने वेळोवेळी पहिला आहे. उदयनराजे याच विश्रामगृहावर तसेच थेट फलटणमध्ये आक्रमक होऊन त्यांना भिडण्यासाठी गेले होते. रामराजेही त्यांना संधी मिळाली की उदयनराजेंवर टीका करत होते. अशा प्रकारे अनेकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, उदयनराजे भाजपमध्ये गेल्यापासून दोघामध्ये कायम अबोला राहिला आहे. कोणीही कोणावर टीका केली नाही. यामुळे दोन्ही गोटांमध्ये शांतता होती. अशातच आज रामराजे शासकीय विश्राम गृह एकमध्ये बसले होते. त्यावेळी उदयनराजे तेथे पोहोचले. दोघांनी एकमेकांना पाहिल्यानंतर नमस्कार केला. त्यावेळी दोघांच्या असणाऱ्या एका कॉमन मित्राने उदयनराजे यांना बसण्याची विनंती केली. खा. उदयनराजे थांबल्यानंतर त्यांनी रामराजे यांच्याशी चर्चा केली. हळूहळू दोघांमध्ये दिलखुलास गप्पा रंगल्या व कोरोनाबाबत एकमेकांना काळजी घेण्यास सांगितले.

Leave a Comment