हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । सातारा लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राजे समर्थकांकडून मोठ्या प्रमाणात भव्य असं शक्ती प्रदर्शन करण्यात आले. उदयनराजे हे जलमंदिर निवासस्थानातून बैलगाडीमध्ये उभं राहून अर्ज दाखल करण्यास निघाले होते. यावेळी भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले हे सुद्धा त्यांच्या सोबतीला होते. त्यामुळे पुन्हा एकदा “भाई भाई साथ साथ” असा अनुभव सातारकरांना पाहायला मिळाला.
उदयनराजे भोसले यांनी एबी फॉर्म भरण्याची प्रक्रिया गाडीत बसूनच पूर्ण केली आहे. साताऱ्यातील गांधी मैदानातील सजवलेल्या रथातून शक्ती प्रदर्शनाला सुरुवात झाली आहे. यावेळी त्यांच्यासोबत शिवेंद्रराजे भोसले, महेश शिंदे, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, अतुल भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे देखील साताऱ्यात दाखल झाले. उदयनराजे भोसले यांचा मोठ्या मताधिक्याने विजय होईल असा विश्वस एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
उदयनराजेंचा सामना शशिकांत शिंदेंसोबत –
दरम्यान, छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शशिकांत शिंदे सातारा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. २०१९ साली जेव्हा उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिला आणि भाजपकडून लोकसभेची पोटनिवडणूक लढवली त्यावेळी शशिकांत शिंदे यांनी पायाला भिंगरी लावून उदयनराजेंचे प्रतिस्पर्धी शिरनिवास पाटील यांचा प्रचार केला होता आणि उदयनराजेंचा प्रभाव करण्यात सिंहाचा वाट उचलला होता. त्यामुळे २०१९ च्या पराभवाचे उट्टे काढणायचा उदयनराजेंचा प्रयत्न असेल. सर्व दुसरीकडे शरद पवारांचे एकनिष्ठ असलेले शशिकांत शिंदे साताऱ्याचा राष्ट्रवादीचा गट अबाधित राखण्याचा प्रयत्न करतील. दोन्हीही नेते हे राजकारणातील वाघ असल्याने सातारा लोकसभेची निवडणूक रंगतदार होणार हे निश्चित …..