उद्यनराजेंची अशीही समाजसेवा…! व्हिडिओ व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । लाेकसभा पाेटनिवडणुकीत साताराचे खासदार उदयनराजे भाेसले यांचा पराभव झाला. त्यानंतरही त्यांनी आपले समाजसेवेचे व्रत सुरु ठेवले. त्यामुळेच आजही त्यांच्या जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी नागरीकांची गर्दी असते. अशाच एका अडचणीत असलेल्या आजीचे अश्रू पुसतानाचा त्यांचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे.

त्यांच्याकडे दररोज सुमारे ५० ते ६० नागरीक या ना त्या कारणाने भेटायला येतात. यामध्ये युवा वर्गाबरोबरच ज्येष्ठांची देखील लक्ष्णीय संख्या आहे. कोणाचे काम हाेत नसेल तर त्यांच्या स्टाईलने अडलेल्या नडलेल्यांची काम करताना दिसतात. माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या कामाची पद्धत सातारकरांसाठी विशेषतः शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना नवीन नाही.

एखादे काम हाेत नसेल तर नागरीक उदयनराजेंकडे धाव घेतात. ते काम हाेवू अगर नये परंतु नागरीकांना उदयनराजेंना भेटल्यानंतर दिलासा मिळताे असे नेहमी एेकावयास मिळते. सध्या उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेस येथे नागरीकांची गर्दी असते. आपले काम झाल्यानंतर नागरीक उदयनराजेंसमवेत छायाचित्र काढण्यास उत्सुक असतात. उदयनराजेही छायाचित्रसाठी शक्यताे काेणाला नाही म्हणत नाही.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

 

Leave a Comment