शिवेंद्रराजेंना मीच निवडूण आणणार – उदयनराजे भोसले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

शिवेंद्रराजे आणि माझ्यात फक्त रस्त्यात अंतर आहे असं म्हणत सातारचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यासोबतच्या वादावर पडदा टाकला. यावेळी शिवेंद्रराजेंना आगामी विधानसभेला मीच निवडूण आणणार असंही भोसले यांनी जाहीर केलं. सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शिवेंद्रराजे भोसले आणि उदयनराजे भोसले यांच्यातील वाद सर्वज्ञात आहे. मात्र लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर दोन्ही राजांमधील वादावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे प्रयत्न करत आहेत. यापार्श्वभुमीवर शिंदे यांच्या बैठकीनंतर उदयनराजे यांनी शिवेंद्रराजे यांच्यासोबत आपले केवळ रस्त्यावर अंतर असल्याचं म्हटलं आहे. तसेच आगामी विधानसभेला शिवेंद्रराजेंना मीच निवडूण आणणार असंही त्यांनी जाहीर केलं आहे.

सर्वसामान्य उमेदवार निवडणुकीला उभेच राहत नाहीत त्याला मी काय करणार असं म्हणत राष्ट्रवादी व काँग्रेसच्या सर्व आमदारांना आपण आगामी विधानसभेला निवडूण आणणार असल्याचं उदयनराजेंनी सांगितलं.

सातारा लोकसभा मतदारसंघाच्या ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाचे –

मला फक्त समुद्राचीच लाट माहीत आहे – उदयनराजे भोसले

पुरूषोत्तम जाधवांचा शिवसेनेत प्रवेश, उदयनराजे भोसलेंच्या विरोधात लढवणार लोकसभा

स्मिता आर आर पाटील यांना सांगली लोकसभा मतदार संघातून उमेदवारी द्या

उदयनराजे भोसले यांच्या विरोधात तृथीयपंथी उमेदवार रिंगणात

साहेब आपण आपल्या निर्णयाचा पुर्नविचार करा, रोहित पवारांची आजोबांना भावनिक साद

नगरमध्ये राष्ट्रवादीकडून सुजय विखेंना प्रतिस्पर्धी कोण ?

Leave a Comment