उद्धव ठाकरेंमध्ये देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता- संजय राऊत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाजप नेते सातत्याने हल्लाबोल करत असून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मात्र पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांचे कौतुक केलं आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांना नजीकच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राष्ट्रीय स्तरावर काम करू शकतात का?’ असा सवाल केला.

यावर उत्तर देताना राऊत म्हणाले, ‘उद्धव ठाकरे यांच्यामध्ये राष्ट्राचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा आपोआप देशाचा नेता होत असतो.’ दरम्यान, शिवसेनेनं गोवा आणि उत्तर प्रदेश राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी तयारी सुरु केल्याचं राऊत यांनी जाहीर केलं आहे.

गोवा आणि उत्तरप्रदेश मध्ये शिवसेना निवडणूक लढवणार असून दोन्ही ठिकाणी महाविकास आघाडीचा प्रयोग होईल असे संकेत यावेळी संजय राऊतांनी दिले. त्यामुळे भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Leave a Comment