एसटी कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी मागे पुढे पाहणार नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य मार्ग परिवहन महामंडळ, पुणे विभागाच्या या पहिल्या विद्युतप्रणालीवरील बसचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यांसाठी जे जे करणं शक्य आहे ते ते केले आहे. आणि यापुढेही करणारच आहे. त्यात कुठेही मागेपुढे पाहणार नाही. परिवारातील सदस्य म्हणून आम्ही एसटी कर्मचाऱ्यांकडे पाहत आहोत. म्हणूनच एसटी अडचणीत असताना शासनाने मदत केली, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली.

विद्युतप्रणालीवरील बसच्या लोकार्पण कार्यक्रमावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे याची उपस्थिती होती. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, सर्वसामान्यांना परवडणारी परिवहन सेवा देण्याचे काम एसटी करत असल्याने एसटीचा तोटा वाढला आहे. मागील काही महिने, एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन शासनाकडून दिले आणि पुढच्या काही वर्षाची हमी शासनाने घेतली आहे. सर्व करता येतं पण पैशांचे सोंग आणता येत नाही. एसटी कर्मचाऱ्यांसाठी जे जे करणं शक्य आहे ते केलं आणि यापुढेही करणारच आहे.

पर्यावरणपूरक वाहने सर्वात जास्त असणारी मुंबई हे पहिले शहर ठरणार आहे. एसटीतसुद्धा हा प्रयोग आपण करत आहोत. एसटी सेवा प्रदूषणविरहित कशी होईल, याकडे लक्ष देण्याची गरज आहे, तसा आपला प्रयत्न असणार आहे. एसटी सुधारणांसाठी नवीन संकल्पना आणतो आहोत. काळ बदलतो तसे तंत्रज्ञान बदलते, गरजा बदलत आहेत. या बदलाप्रमाणे प्रगती करणे आपल्या सर्वांचे उद्दिष्ट आहे. एसटी कर्मचारी- तुम्ही-आम्ही, राज्यातील जनता सर्व एका कुटुंबातील सदस्य आहोत.

हा तर केवळ योगायोगच

आपल्या एसटीच्या माध्यमातून देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत. आपल्या एसटीची सुरुवात ही 1948 साली झाली. पहिली एसटी कशी होती, तिचं रंगरूप आकार कसं होतं हे आज आपण चित्रफितीच्या माध्यमातून पाहिलं. आपली एसटी काळानुरुप किती बदलली हे यातून दिसलं. एसटीची ही वाटचाल पुण्यात सुरू झाली आणि एसटीचा आजचा अमृतमहोत्सवी कार्यक्रमही पुण्यात होत आहे हा एक योगायोग आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हंटले.

Leave a Comment