महाराष्ट्र योद्धा उद्धव ठाकरे; शिंदेंच्या बालेकिल्ल्यात बॅनरबाजी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील संघर्ष तीव्र होत आहे. त्यातच आता एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ जोरदार बॅनरबाजी पहायला मिळत आहे. या बॅनर वर ठाकरेंचा उल्लेख महाराष्ट्र योद्धा असा करत एकप्रकारे शिंदे याना आव्हान देण्यात आलं आहे.

ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ बॅनरल लावण्यात आले आहेत. या बॅनरवर उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्र योद्धा असा उल्लेख करण्यात आला आहे. न झुकणारा न वाकणारा दिल्लीश्वरांच्या अन्यायी महाशक्तिला महाराष्ट्राच्या स्वाभिमानी वृत्तीने आव्हान देणारा बाळासाहेबांच्या संघर्षमय विचाराराच खरा वारसदार उद्धव ठाकरे, असा मजकूर या बॅनरवर देण्यात आला आहे. सध्या हे बॅनर सध्या ठाण्यात चर्चेचा विषय ठरले आहेत.

दरम्यान, निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव दिले आहे तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव देण्यात आलं आहे. सध्या ठाकरे vs शिंदे हा वाद अजूनही सर्वोच्य न्यायालयाच्या दारात असून १ नोव्हेंबरला पुढील सुनावणी पार पडणार आहे. राज्यातील शिंदे फडणवीस सरकारचे भवितव्य देखील कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून आहे.