Breaking News | राज्यात पुन्हा संचारबंदी जाहीर; मुख्यमंत्री ठाकरेंचा मोठा निर्णय, पहा लाईव्ह अपडेट्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात १४ एप्रिल रात्री ८ नंतर कडक संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत घोषणा केली आहे. राज्यात उद्यापासून कलम १४४ लागू होणार असल्याचं मुख्यमंत्रांनी सांगितले आहे. राज्यात कोविड रुग्णांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मिनी लॉकडाऊन घोषित केला आहे. दुसऱ्या लाटेत आरोग्यव्यवस्थेवर ताण वाढला असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची तातडीने गरज असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. आता जर उणी दुनी काढत बसलो तर महाराष्ट्र आपल्याला माफ करणार नाही. एकमेकांसोबत उभं राहूनच आपल्याला हा लढा द्यावा लागेल असंही ठाकरे पुढे म्हणाले.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/1137206120025947

मागील आठवडाभरातील शासकीय उपाययोजनांची माहिती देत उद्धव ठाकरे यांनी केंद्राकडे कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांची मागणी यावेळी केली. केंद्राने GST च्या परताव्याबाबत विचार करावा असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. सध्या सुरू असलेलं लसीकरण थांबवून चालणार नाही. त्याची उपलब्धता मुबलक प्रमाणात होणं आवश्यक आहे. ब्रिटन आणि इतर अनेक आतापर्यंत अर्ध्या लोकसंख्येला लस देण्यात आल्यामुळे तिथली परिस्थिती सुधारण्यास मदत झाली आहे. तशीच उपाययोजना आपल्याकडेही करावी लागणार आहे.

लॉकडाऊनची नियमावली थोडक्यात

१) १४ एप्रिल पासून रात्री १८ पासून राज्यात कलम १४४ लागू – दिवसा आणि रात्री संचारबंदी

२) अत्यावश्यक काम नसेल तर घराबाहेर पडण्यास बंदी – जनता कर्फ्युचं पालन करण्याचं आवाहन

३) कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारला मदत करा.

४) खाजगी आस्थापना बंद राहतील.

५) सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत अत्यावश्यक सुविधा चालू राहणार

६) सार्वजनिक वाहतूक चालू राहणार – पण अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठीच (वैद्यकीय सेवा, लस उत्पादक आणि वाहतूक, सफाई – कर्मचारी, जनावरांशी संबंधित दुकानं, दवाखाने, शीतगृह, पावसाळ्यापूर्वीची कामं चालू, दूरसंचार, ई-कॉमर्स, पत्रकार, पेट्रोलपंप)

७) बांधकाम आणि इतर उद्योगांना कामगारांची सोय जागेवरच करण्याचे आदेश

८) हॉटेल, रेस्तराँ बंद राहणार, पार्सलची सोय मात्र उपलब्ध; हातगाडीवाल्या लोकांनाही पार्सल सुविधा देता येणार

https://www.facebook.com/CMOMaharashtra/videos/153267430035100/

राज्य सरकारने लोकांना अन्नसुरक्षा योजनेतून मोफत अन्नधान्य देण्याची व्यवस्था केली आहे. यानुसार राज्यातील ७ कोटी नागरिकांना ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ देण्यात येणार आहे.

वृद्ध आणि असहाय नागरिकांना येत्या २ महिन्यांसाठी २ हजार रुपये भत्ता आगाऊ देण्याचंही उद्धव ठाकरे यांनी कबूल केलं. राज्यातील ३५ लाख लोकांना याचा लाभ होणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. १२ लाख नोंदणीकृत बांधकाम कर्मचाऱ्यांना, अधिकृत फेरीवाल्यांना, ५ लाख रिक्षाचालकांना १५०० रुपये प्रतिमहिना देण्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. राज्यात रेमडिसिव्हरची मागणी वाढली असून दिवसा लाखभर औषधांचा डोस येत्या काळात लागण्याची शक्यता असल्याने ही परिस्थिती विचारात घेऊनच या निर्बंधांचा विचार केला असल्याचं ठाकरे म्हणाले.

एकूणच हा लॉकडाऊन लावत असताना 5400 कोटी रुपयांची मदत ही हातावरचं पोट असणाऱ्यांना आणि आरोग्य सुविधा सांभाळणाऱ्या सेवकांसाठी करण्यात आली आहे. रुग्णवाढ रोखण्यासाठी राज्यातील नागरिकांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.

उद्या रात्री 8 वाजल्यापासून 15 दिवस राज्यभरात निर्बंध लागू होणार
राज्यात 144 कलम संचारबंदी लागू
सकाळी 7 ते रात्री 8 यवेळेत अत्यावश्यक सेवा सुरू राहील
सार्वजनिक वाहतूक चालू राहील
पावसाळी पूर्व कामे चालू रहातील
अधिस्वीकृती धारक पत्रकार सेवा देण्यास मुभा
कर्मचाऱ्यांना लसीकरण बंधनकारक
हॉटेल्स बरोबर फेरीवाल्यांनी सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत पार्सल परवानगी राहील
रेल्वे, बस, लोकल, टॅक्सी सेवा सुरु राहील
अन्न सुरक्षा योजने अंतर्गत 3 किलो गहू, 2 किलो तांदूळ
एक महिना
दोन लाख शिव भोजन थाळी महिनाभर मोफत देणार
35 लाख निराधार, वृद्धांना 1हजार अर्थआहाय्य
नोंदणीकृत घरेलू कामगार, अधिकृत फेरीवाले यांना तसेच 5 लाख परवानाधारक रिक्षाचालक 1500 रुपये अर्थसहाय्य
आदिवासी कुटुंबियांना 2000 रुपये मदत
हातावर पोट असलेल्याना 500 रुपये मदत
जिल्हाधिकारी यांना कोव्हीड नियंत्रण कामासाठी तसेच रुग्णसेवा नियमित ठेवण्यासाठी साठी 3 हजार 700 कोटी निर्धारित केला आहे,

Leave a Comment